जळगाव (प्रतिनिधी) कर्मचारी भविष्य निधी संगठन श्रम एवं रोजगार मंत्रालय भारत सरकारतर्फे ‘निधी आपके निकट 2.0’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. हे औपचारिक उद्घाटन दिल्ली येथील मुख्य कार्यालयातुन आॕनलाईन पध्दतीने झाले. याप्रसंगी जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधि संगठन जिल्हा कार्यालय यांच्यातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ई-नोमिनेशन व ई पी एफ ओ चे नवीन उपक्रमाबाबत अवगत केले गेले. कार्यशाळेमध्ये ई-नोमिनेशन चे महत्व व ईपीएफओ संबंधित बदलत असलेल्या नियमावली व घडामोडींविषयी चर्चा करण्यात आली. (Jalgaon News)
कार्यशाळेप्रसंगी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे सदस्य प्रभाकर बाणासुरे, जैन इरीगेशन सिस्टीम लि.चे चंद्रकांत नाईक, लघुउद्योग भारतीचे नाशिक विभागाचे सचिव समिर साने, जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधी संगठन कार्यालयाचे प्रवर्तक अधिकारी रमण पवार उपस्थित झाले. नाशिक येथील क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त अनिलकुमार प्रितम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, उपभोक्ता, सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. वाढीव पेंशन याविषयी सेवाविनृत्त कर्मचाऱ्यांनी कायदेदृष्ट्या झालेल्या बदलांविषयी प्रश्नोत्तर स्वरूपात चर्चा केली. यात त्यांचे शंकांचे निरसन प्रभाकर बाणासुरे यांनी केले. त्यात त्यांनी ईपीएस-1995 या कायद्याविषयी सविस्तर बारकावे सांगितले. 2014 मध्ये वाढीव पेंशन अंशदानाविषयी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
प्रत्येकाने नविन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे कुठेलेही ईपीएफशी संबंधित फाॅर्म हे आॕनलाईनच भरले जातात, यासाठी निधी आपके निकट 2.0 हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरू शकतो. भविष्यातील आर्थिक सुरक्षितेसाठी पेंशनधारकांची कर्तव्य त्यांच्यात जनजागृती संबंधी माहिती दिली. सोशल माध्यमांतुन येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन शंकांचे निरसन करण्याचे आवाहन प्रभाकर बाणासुरे यांनी केले. यामध्ये ई-नोमिनेशन बद्दलचे विस्तृत विवेचन, एम्पालाॅयर आणि एम्पाॅलय यांनी भरावयाची माहिती, कामगाराच्या मृत्यूपश्चात वारसाला मिळणारा लाभ त्यासाठी करावी लागणाऱ्या महत्त्वाच्या नोंदीविषयी सांगितले. उपस्थितीत आस्थापनांचे प्रतिनिधि यांच्या प्रश्नाला उत्तरे दिलीत व शंका समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमण पवार यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी जिल्हा भविष्य निधी संगठन कार्यालयातील अधिकारी शाम दुबे, सोपान विभांडीक, योगेश मदनकर व कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले.