TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावे, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आमदार नितेश राणे यांनी अतिशय घाणेरडे आरोप केले. ते सगळे आरोप तथ्यहीन असून आज त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावे. नाहीतर कायदेशीर कारवाईला समोर जावं”, असा इशारा वरूण सरदेसाई यांनी दिला आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकारपरिषदेत सचिन वाझे प्रकरणावरून केलेल्या आरोपांना आज (सोमवार) युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी पत्रकारपरिषदेत उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब यांची देखील उपस्थिती होती. ”भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारपरिषद घेऊन, माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केले, हे सगळे आरोप हे तथ्यहीन असून आज त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहे. त्यांनी जे काही आरोप केले, हे त्यांनी सिद्ध करावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला त्यांनी सामोरं जावं.” असा इशारा वरूण सरदेसाई यांनी दिला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वरूण सरदेसाई म्हणाले, ”मी एका अतिशय सुसंस्कृत व उच्चशिक्षित कुटुंबातून येतो, मला कुठंतरी राजकारणाची आवड आहे. म्हणून मी युवासेनेचं शिवसेनेचं काम करतो. आज जे काही घाणेरडे आरोप करण्यात आले आहेत, अशी काम करण्याची माझी इच्छा नाही व माझ्या हातून तसं घडणार देखील नाही. मी माझ्या कुटुंबाची संपूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या राणे कुटंबाची पार्श्वभूमी मला वाटतं सर्वश्रुत आहेच. मग अगदी त्यांची ती सुरूवातीची गँग असो व नंतर त्यांच्यावर असंख्य अगदी गंभीर गुन्हे खून, अपहरण, खंडणी असे विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्या कुटुंबावर दाखल आहेत. या सगळ्याचा पाढा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत मांडला आहे, तो रेकॉर्डवर देखील आहे.”

तसेच, ”माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी मी सांगितली आहे, त्यांच्या कुटुंबाची माहिती सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कोणी कोणावर कसले आरोप करावे, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तसं तर संपूर्ण राणे कुटुंबीयांना बेछुट आरोप करायची सवयच लागली आहे. ज्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते, तेव्हा असेच आरोप त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर केले. आज जेव्हा ते भाजपात गेले तेव्हा, महाविकासआघाडीमधील विविध नेत्यांवर करत आहेत व गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करत आहेत. खरंतर या संपूर्ण राणे कुटुंबीयांना महाराष्ट्रातील जनता आता, अजिबात गांभीर्याने घेत नाही, त्यांना भीक घालत नाही. त्यांची जेव्हा कधी पत्रकारपरिषद होते, त्यांचं जेव्हा कधी एखादं विधान समोर येतं व जेव्हा ते टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर दाखवलं जातं. त्याच्या खालच्या जर तुम्ही कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्राची जनता त्यांना किती गांभीर्याने घेते.” असं देखील वरूण सरदेसाई यांनी यावेळी बोलून दाखवलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

विद्यापीठामध्ये शासनाच्या जीआर ला केराची टोपली : अँड. कुणाल पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा तालुक्यातून अट्टल चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

November 24, 2020

मुख्यमंत्री ठाकरेंसह दिग्गज नेत्यांचे बंगले BMCकडून डिफॉल्टर घोषित !

December 14, 2020

‘भिम आर्मी’ सामाजिक संघटनेची धरणगाव तालुका कार्यकारणी जाहीर !

February 25, 2022

जळगाव महानगरपालिकेची सत्ता प्रहार नक्कीच काबीज करेल : अनिल चौधरी !

August 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group