धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या जानेवारी महिन्यात नाशिक विभागाअंतर्गत तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण धरणगाव येथील एका इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी घेण्यात आले होते. यात माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणात एकूण पाच टप्पे करण्यात आलेली होती.
शेवटचा टप्पा जानेवारी महिन्यात म्हणजेच पाचवा टप्पा या पाचव्या टप्प्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आलेले नाही. शिक्षकांनी वारंवार प्रशिक्षणाच्या समितीची नेमणूक केलेली होती. त्यांना विचारले असता ते मात्र अद्यापही उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. या प्रशिक्षणात आपली शाळा सोडून पाच दिवस प्रशिक्षण घेण्यात आले होते. ते पाच दिवसाच्या प्रशिक्षण झाल्यानंतर प्रमाणपत्र देणे आवश्यक होते. ते देखील मात्र देण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षक प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत. दाद मागावी तर कोणाकडे मागावी? असा प्रश्न तालुक्यातील शिक्षक विचारत आहेत.