TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र नावावर आक्षेप

राज्य संघटनेने नोटीस बजावून दर्शविला विरोध ; न्यायालयात जाणार

vijay waghmare by vijay waghmare
September 25, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत पात्र सदस्यांच्या यादीपैकी तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र संघटनेच्या नावावर अधिकृत महाराष्ट्र संघटनेने आक्षेप घेतला आहे. तायक्वांदो मध्ये दोन संघटना कार्यरत असतील आणि त्यांच्यात वादविवाद तसेच कोर्ट केस सुरू असेल तर, त्यापैकी एकाच संघटनेला मतदानाचा अधिकार कसा काय दिला जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करून न्याय न मिळाल्यास त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा, तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई संघटनेचे महासचिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री मिलिंद पठारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेतर्फे अलीकडेच एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात येत्या २ नोव्हेंबरला ऑलिंपिक संघटनेची निवडणूक घेण्याचा निर्णय झाला आहे. मतदान प्रक्रियेसाठी पात्र राज्यांतील २२ अधिकृत क्रीडा संघटनांची प्राथमिक यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीत राज्यात तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र या नावाने कार्यरत असलेल्या दोन संघटनांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. दोन्ही संघटनांच्या स्वतंत्र निवडणुका झाल्या असून दोन्ही संघटना देशपातळीवर दोन वेगवेगळ्या फेडरेशनला संलग्न आहेत. न्यास नोंदणी व न्यायालयातही वाद सुरू आहे. असे दोन संघटनांमध्ये वाद सुरू असताना तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र नावाचा समावेश मतदानासाठी पात्र संघटनांच्या यादीमध्ये समावेश आहे , मात्र या नावावर तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेला आक्षेप आहे. महासचिव मिलिंद पठारे यांच्या मते, घटनेतील तरतुदीनुसार तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई ही संघटना केवळ तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियालाच संलग्न असू शकते व ती संलग्नता आमच्याकडे आहे.

READ ALSO

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

ऑलिंपिक संघटनेवर पुढचे पाऊल अवलंबून

या प्रकरणी आम्ही महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनला कायदेशीर नोटीस बजावली आहे. आम्ही दिलेल्या आक्षेपावर ऑलिंपिक संघटना काय निर्णय घेते, यावर आमचे पुढचे पाऊल अवलंबून असणार आहे. यासंदर्भात न्यायालयाचे दार ठोठावण्याचा पर्याय आमच्याकडे उपलब्ध असल्याचे श्री. पठारे या वेळी म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंडिया तायक्वांदो विरूद्ध आमची न्यास नोंदणी कार्यालय मुंबई येथे केस सुरू आहे. असे असताना महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनचा मनमानी एकाला एक व दुसऱ्या बाजूला दुसराच नियम सोईस्कर पद्धतीने लावून मनमानी कारभार सुरू आहे. शिवाय, तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाने आम्हाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या समांतर संघटनेला आगामी निवडणुकीत मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी आमची मागणी आहे. ऑलिंपिक संघटनेच्या परिपत्रकाप्रमाणे याविषयी आम्ही निर्धारित तारखेच्या आत (२३ सप्टेंबर) आपला आक्षेप नोंदविला आहे.

मिलिंद पठारे म्हणाले, राज्यातील इतरही अनेक क्रीडा संघटनांमध्ये वाद सुरू असून, न्यायालयात खटले चालू आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दोनपैकी एका संघटनेला मतदानाचा अधिकार देणे पूर्णपणे चुकीचे आहे. एकतर दोन्ही संघटनांना मतदानाचा अधिकार द्यावा किंवा कुणालाच देऊ नये. सर्वांसाठी सारखा नियम असायला पाहिजे.

मान्यता तत्काळ रद्द करावी.

संघटना राज्य ऑलिंपिक संघटनेची मान्यताप्राप्त कशी असू शकते ? राज्यातील अधिकृत राज्य संघटनेसंबंधात कोर्टात वाद सुरू असल्याने येणाऱ्या महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र या नावे संस्थेला सहभागी करून घेणे, तसेच या संस्थेला ऑलिंपिक संघटनेची मान्यता मिळणे, यावर आमचा प्रामुख्याने आक्षेप आहे. या आक्षेपाची नोंद घेऊन तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र या नावाने दुसरे पदाधिकारी असलेल्या संघटनेची मान्यता तत्काळ प्रभावाने रद्द करून या संघटनेला आगामी निवडणुकीत सहभागी होण्यास मनाई करावी, अशी आमची मुख्य मागणी आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

सहकारिता विभूषण’ पुरस्काराने शैलजादेवी निकम सन्मानित. कृभको तर्फे राष्ट्रीय पातळीवर गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ धरणगाव यांचे फेसबुक पेजचे विमोचन

January 26, 2022

पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह जास्त ; जिल्ह्यात ४४६ रुग्ण आढळले तर ८०३ कोरोनामुक्त !

September 23, 2020

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, गुरुवार ७ नोव्हेंबर २०२४ !

November 7, 2024

देशातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण : पंतप्रधान

February 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group