भुवनेश्वर (वृत्तसंस्था) ओडिशाचे (Odisha) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री (Odisha health and family welfare minister) आणि बिजू जनता दल (बीजेडी) ज्येष्ठनेते नबा दास (Biju Janata Dal (BJD) leader Naba Das) यांच्यावर आज दुपारी प्राणघातक हल्ला झाला होता. दास यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केला होता.
दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने घातल्या गोळ्या !
पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांच्या छातीत 4 ते 5 गोळ्या शिरल्या होत्या. 60 वर्षीय दास हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गांधी चौकात आपल्या कारमधून उतरत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दासने त्याच्यावर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळीबार केला होता. दास यांच्यावर अपोलो हॉस्पिटमलमध्ये उपचार सुरु असतांना त्यांचा दुर्दैवी निधन झाले आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते !
पोलिसांनी हल्ला करणाऱ्या एएसआय (ASI) गोपालदास याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12.15 च्या सुमारास हा हल्ला झाला. नबा दास ब्रजराजनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. कारमधून उतरताच एएसआय गोपालदास यांनी त्यांना गोळ्या घातल्या. नबा दास यांना पुढील उपचारांसाठी हवाई रुग्णवाहिकेद्वारे भुवनेश्वरला हलवण्यात आले होते.
सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक !
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मंत्री नाबा दास यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल तीव्र शोक आणि दुःख व्यक्त केले आहे. नवीन पटनायक यांनी म्हटलं आहे की, नबा दास हे सरकार आणि पक्षासाठी खूप महत्वाचे होते. त्यांच्या निधनाने ओडिशा राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नबा किशोर ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे 15 कोटींहून अधिकच्या किंमतीची जवळपास 70 वाहने आहेत. त्यात एका मर्सिडीज बेंझचाही समावेश आहे. या कारची किंमत जवळपास 1.14 कोटी रुपये आहे.
गोळ्या झाडणारा पोलीस अधिकारी आहे तरी कोण?
ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर गोळीबार करणारा दुसरा कोणी नसून पोलीस अधिकारी आहे. ASI गोपाल दास त्याचे नाव आहे. तो झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथील गांधी चौक पोलिस चौकीत तैनात होतो. गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्वरने नबा दास यांच्यावर गोळीबार केला. गोपाल दास याने पुर्ण नियोजनातून हा हल्ला केला. त्याने अगदी जवळून गोळी झाडली आहे. या हल्ल्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नबा दास कारमधून खाली उतरताच गोपाल दास याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर सत्ताधारी पक्ष बीजदच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पक्षाचे अनेक कार्यकर्ते आंदोलन करत आहे.