मुंबई (वृत्तसंस्था) एकिकडे संपूर्ण जग कोरोनाव्हायरसशी दोन हात करतं आहे. त्यात आता आणखी एका व्हायरसने एंट्री घेतली आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. कोरोनाव्हायरसप्रमाणे आता मंकीपॉक्स हा व्हायरस समोर आला आहे. अमेरिकेमधील टेक्सास शहरात मंकीपॉक्स या व्हायरसचा रुग्ण सापडला आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रीव्हेंशन यांनी शुक्रवारी याबद्दलची माहिती दिली आहे.
मंकीपॉक्स या रोगाचा टेक्सासमध्ये सापडलेला पहिला रुग्ण आहे. या रुग्णाने नायजेरिया येथून अमेरिकेत प्रवास केला आहे. सध्या या रुग्णावर डलास या ठिकाणी उपचार सुरु आहे. डलास काऊंटी जज क्ले जेनकिन्स यांनी मंकीपॉक्स या रोगाबद्दल सांगितले आहे की, या रुग्णांपासून कोणताही धोका नाही. नायजेरिया सोडून आफ्रिका खंडात मंकीपॉक्स या रोगाचा प्रकोप १९७० मध्ये बघायला मिळाला आहे.
CDC च्या दिलेल्या माहितीनुसार, २००३ मध्ये मंकीपॉक्स या आजारावर अमेरिकेमध्ये तांडव घातले होते. मंकीपॉक्स सापडलेल्या रुग्णाची प्रवास हिस्ट्री काढण्याचे काम सुरु आहे. या व्यक्तीच्या संपर्कामध्ये असलेल्या सर्वांची चाचणी केली जाणार असल्याचे सीडीसीने यावेळी सांगितली आहे. मंकीपॉक्स व्हायरस हा स्मॉल पॉक्स व्हायरस सारखेच आहे.
काय आहे मंकीपॉक्स व्हायरस?
मंकीपॉक्स हा जुना व्हायरस आहे. हा व्हायरस आफ्रिकन देशांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. उष्णकटिबंध परिसरात, मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशातील दुर्गम भागात हा व्हायरस पसरतो. त्यामुळेच या व्हायरसचे पश्चिम आफ्रिकी आणि मध्य आफ्रिकी असे दोन मुख्य प्रकार आहेत.
काय आहेत मंकीपॉक्सची लक्षणं?
सुरुवातीला ताप, सूज
डोकेदुखी, कमरेत वेदना, स्नायूंमध्ये वेदना
चिकनपॉक्ससारखेच त्वचेवर पुरळ येणं
ताप आल्यानंतर असे पुरळ येऊ लागतात.
चेहऱ्यावर पुरळ येतात मग ते शरीरावर पसरतात
सामान्यपणे हात, हाताचे पंजे आणि पायांच्या तळव्यांवर पुरळ येता.
हा व्हायरस १४ ते २१ दिवस शरीरात राहू शकतो.
मंकीपॉक्स व्हायरस हा स्मॉलपॉक्स व्हायरससारखाच असतो. तज्ज्ञांच्या मते, हा आजार तसा घातक नाही आणि त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यताही तशी कमी आहे. मंकीपॉक्सची बहुतेक प्रकरणं सौम्य असतात. काही आठवड्यांतच हा आजार बरा होतो. पण कधी कधी हा आजार गंभीरही होऊ शकतो. पश्चिम आफ्रिकेत या आजारामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे.