जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११४२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १२२२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २४९, जळगाव ग्रामीण-३६, भुसावळ- १६९, अमळनेर-७६, चोपडा-११५, पाचोरा-४३, भडगाव-३७, धरणगाव-४३, यावल-६६, एरंडोल-५४, जामनेर-१३, रावेर-२७, पारोळा-५७, चाळीसगाव-६८, मुक्ताईनगर-५७, बोदवड-२९, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण ११४२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ९१ हजार ३२७ पर्यंत पोहचली असून ७७ हजार ९५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १६५३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११७१८ रुग्ण सध्या उपचार घेताय.