जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९९२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ७१६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ४३०, जळगाव ग्रामीण-५४, भुसावळ- ७३, अमळनेर-१५, चोपडा-९७, पाचोरा-२१, भडगाव-०८, धरणगाव-४०, यावल-३२, एरंडोल-२५, जामनेर-०५, रावेर-२५, पारोळा-१५, चाळीसगाव-९४, मुक्ताईनगर-२०, बोदवड-२६, इतर जिल्ह्यातील-१२ असे एकुण ९९२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ७१ हजार ६१९ पर्यंत पोहचली असून ६२ हजार ३१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १४४९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ७८५२ रुग्ण सध्या उपचार घेताय.
















