जळगाव (प्रतिनिधी) एका ७० वर्षीय महिलेच्या तोंडावर ठोसा मारून ३० हजारांची सोनसाखळी लांबवल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजता शहरातील गुरुदत्त कॉलनीत घडली.
या संदर्भात अधिक असे की, शोभा हसमुख जाणी (वय ७०, रा.विष्णूनगर, गणेश कॉलनी, जळगाव) या शनिवारी सकाळी ७ वाजता मंदिरातून घरी परत येत होत्या. शिव कॉलनी स्टॉपवरून गुरुदत्त कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराजवळून घरी पायी जात असताना अचानक दुचाकीचीवर दोन जण आले. या भामट्यांनी शोभा जाणी यांच्या तोंडावर ठोसा मारून ३० हजारांची सोनसाखळी लांबवली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.