कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) कासोदा येथील श्री गणेश फोटो स्टुडिओमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त भारतीय पत्रकार महासंघाच्या एरंडोल तालुका बैठक जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भारतीय पत्रकार महासंघच्यावतीने पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र जिल्हाअध्यक्षांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला फुल हार अर्पण करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिचय नुरुद्दीन मुल्लाजी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी एरंडोल तालुका कार्याध्यक्षपदी प्रतिक जाधव (जवखेडे), उपाध्यक्षपदी गणेश रमेश कोळी (उत्राण), कासोदा शहराध्यक्षपदी शेख मुश्ताक शेख अशरफ यांची तर फरकांडे शहराध्यक्षपदी हेमराज जनार्दन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे प्रमाणपत्र जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी एरंडोल तालुका अध्यक्ष नितीन ठक्कर, आरिफ पेंटर, दीपक शिंपी, प्रेस फोटोग्राफर किशोर चौधरी, आरपीआयचे एरंडोल तालुका अध्यक्ष प्रविण बाविसकर, अर्तजा मुल्लाजी उपस्थित होते.