जळगाव(प्रतिनिधी) : मेहरून येथील अनवारूल उलूम अरबी मदरसा संचलित शेखुल हिंद उर्दू शाळा सुरू असून त्या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मागील सात वर्षापासून या शाळेतील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी तर्फे गणवेश दिले जातात.
यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शाळेतील सुमारे ५७ विद्यार्थ्यांना जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मन्यार बीरादरीचे सहसचिव अब्दुल रऊफ़ रहीम व मोहसीन युसुफ ,शेखु उलहिंद चे संचालक अब्दुल हमीद व अल्ताफ शेख, अरबी मदरसाचे प्रमुख मौलाना अब्दुल रहमान तसेच मुख्याध्यापक जानिसर अख्तर तर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मोहम्मद साद पटेल या विद्यार्थ्याने कुरान पठणाद्वारे केली तर हुरेन तोफिक यांनी हम्द सादर केली, नात उम्मे हबीब यांनी सादर केली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुस्कान कौसर व उम्मे हबीब यांनी उपस्थितांसमक्ष सुंदर असे स्वातंत्र्य बाबत भाषण दिले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेकुल हिंद शाळेचे शिक्षक व शिक्षिका सर्वश्री जानीसर अखतर, शिरीन शेख, रुबीना ताजुद्दीन, नझरुद्दीन काझी, अब्दुल हमीद पठाण, मोहम्मद अर्शद,वसीम खान व शाहिद अहमद यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाची सांगता मौलाना अब्दुल रहमान यांच्या दुवाने करण्यात आली.