जळगाव (प्रतिनिधी) बाथरूममध्ये आंघोळीसाठी जातांना अचानक पाय घसरून पडल्यावर डोक्या जबर मार लागल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे नवी पेठेत घडली आहे. सचिन राधेश्याम राणा असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
एलआयसी एजंटचे काम काम करणारे सचिन राधेश्याम राणा (वय ३९) हे आज पहाटे नेहमी प्रमाणे पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेले. यावेळी त्यांचा पाय अचानक घसरल्याने ते डोक्यावर पडले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना तातडीने नातेवाईकांनी खासगी उपचारार्थ दाखल केले. तब्बेत गंभीर असल्यामुळे त्यांना गुलाबराव देवकर वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी डॉ. सचिन अहिरे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
















