धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी प्र.चा. गावाजवळील एस.एस.बी.टी. कॉलेज समोरील हायवे रोडवर मोटारसायकलने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दिनांक ०७ मार्च २०२२ रोजी रात्री १०.३० वाजेचे सुमारास बांभोरी प्र.चा. ता. धरणगावाजवळील एस.एस.बी.टी. कॉलेज समोरील हायवे रोडने गणेश भागवत पाटील (वय ४६ वर्ष रा. बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव) हे रस्ता पार करीत असतांना मोटार सायकल क्र.एम.एच१९/ डी.एच. ०५०७ वरील चालक (नाव गाव माहीत नाही) याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल पाळधी कडुन जळगावकडे भरधाव वेगात चालवुन जोरात ठोस मारल्याने त्यांना डोक्यावर व उजव्या पायावर जबर मार लागून दुखापत झाल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी निलेश गणेश पाटील (वय १९, मराठी शाळेजवळ पाटील वाडा बांभोरी प्र.चा ता. धरणगाव) याने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात मोटारसायकल चालकाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकाँ गजानन महाजन करीत आहेत.