धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बिजासनी जिनिंगच्या मागे रेल्वे अपघातात आज दुपारी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, चोपडा येथील महात्मा फुले नगर नागलवाडी रोड परिसरातील रोहिदास आधार माळी (वय 40) यांचा आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मालक गाडीने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला धरणगाव चावलखेडा डाऊन लाईनवर बिजासनी जिनिंगच्या मागे हा अपघात घडला. यासंदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका करीम सय्यद हे करीत आहे. दरम्यान हा अपघात होता की, आत्महत्या याबाबत नातेवाईकांचा जाब जबाब घेतल्यानंतरच स्पष्टता येणार आहे.