अकोला (प्रतिनिधी) अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून गोवंश चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला अटक करून एकुण त्याच्याकडून २ लाख २० हजाराच्या मुद्देमालसह अटक केली आहे. मोहम्मद कासीफ मोहम्मद रफीक (वय २५ वर्ष, रा. प्रिंस चौक, खदान अकोला), असे संशयित आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. नि. शंकर शेळके यांनी गणेशोत्सवनिमित्त अकोला शहर व परिसरात प्रभावीपणे पेट्रोलिंग करण्याबाबत पथकाला आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पेट्रोलिंग करणा-या पथकाला गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, गोवंश चोरी करून एकजण जात आहे. त्यानुसार अकोला एलसीबीच्या पथकाने शिवर टी. पॉईंट जवळ अकोला येथे नाकाबंदी करत आरोपी नामे मोहम्मद कासीफ मोहम्मद रफीक याला पांढ-या रंगाची टाटा व्हिस्टा गाडी (क्र. एम. एच. २४ व्हि. १९०१) सह पकडले. वाहनामध्ये एक गोवंश अमानुषपणे निर्दयतेने कोंबून आणतांना मिळून आले. संशयित आरोपीकडून २० हजार रुपये किंमतीचे गोवंश आणि गाय चोरी करण्याकरिता वापरण्यात आलेली २ लाख रुपये किंमतीचे टाटा व्हिस्टा वाहन असा एकुण २ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे. बोरगांव मंजु यांच्या ताब्यात पुढील कारवाई करण्याकरिता दिला आहे. दरम्यान, गोवंश चोरी करणार्या टोळीतील मोहम्मद कासीफ हा एक प्रमुख मोहरा असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षकसंदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप.नि.गोपाल जाधव, ए.एस.आय.दशरत बोरकर, पोहेकॉ फिरोज खान, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, ना. पो. कॉ. खुशाल नेमाडे, पो.कॉ आकाश मानकर, पो. कॉ. धिरज वानखडे, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, अन्सार अहेमद, लिलाधर खंडारे, स्वप्नील खेडकर, स्वप्निल चौधरी, पो. कॉ. चालक प्रशांत लोखंडे यांनी केली.