जळगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी नगराजवळील एका परिसरात भर दिवसाच्या सुमारास एकाने हवेत गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसराच्या मागील बाजूस असलेले हुडको परिसरातील एका गल्लीत आज दि.१७ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जुन्या वादातून वाद सुरु होता. त्यामुळे घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झालेली होती. हा वाद इतक्या टोकाला गेली लोकांची गर्दी पांगवण्यासाठी एकाने हवेत गोळीबार केल्याने जमलेले लोक तत्काळ घटनास्थळी पळापळ सुरु झाली.
याबाबत जळगाव शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरु केली होती. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे रतन गीते, प्रफुल्ल धांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे अक्रम शेख, प्रीतम पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. दीपक बागुल असं गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर खुनासह मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे कळते. तर गुटख्याची पुडी मागितल्याचा कारणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झालं आणि त्यानंतर दीपकने गोळीबार केल्याचेही कळते.