धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील आठवडे बाजारातून एकाची मोटारसायकल लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दिलीप सरदार पाथरवड (वय ५६, रा. वाघळूद) हे दि.२२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता आपली मोटारसायकल (क्र.एमएच.१९, डीडी ६५२३) ने बाजारात आले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध दि.१९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. प्रदीप पाटील हे करीत आहेत.