धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत एरंडोल रस्त्यारील रामकृष्ण नगरमधून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, नामदेव पितांबर महाजन (वय ६०, रा. लहान माळीवाडा) यांची टीव्हिएस सेंट्रा मोटार सायकल क्र. (एमएच-१९,एसी-२४०२) ही दि. १६ ते १७ डिसेंबरच्या दरम्यान, जावई रोशन शिवाजी मोरे (रा.रामकृष्ण नगर) यांच्या घरासमोरील अंगणात लावलेली होती. अज्ञात चोरट्याने ही मोटार सायकल चोरून नेली. या प्रकरणी नामदेव महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ नाना ठाकरे हे करीत आहेत.