पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील निभोरी येथील एका व्यक्तीच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून तब्बल १ लाख ५८ हजार ५७० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, सतीश उत्तमराव नलवाडे (वय ३७ सेवा निवृत्ती आमिरा घर न.बी. ४, समर्थ व्हॅली, पाचोरा) यांना दि. १८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर ४०७१४०४४०० वरून व ९३५४७४२८२२ या नंबरवरून अज्ञात व्यक्तीने सुषमा नाव सांगून लबाडीच्या इराद्याने सतीश उत्तमराव नलवाडे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या क्रेडिट कार्ड मधून ९९ हजार ९९० व ५८ हजार ५८० असे एकूण १ लाख ५८ हजार ५७० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भगवान बडगुजर करीत आहेत.