यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दहीवद येथील व्यापाऱ्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून १० लाख ३० हजाराची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोन जणांना जेरबंद केले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, यावल तालुक्यातील दहीगाव येथील रहिवाशी कालीदास विलास सुर्यवंशी (वय-३३ रा. एसबीआय भरणा केंद्र रा. दहीगाव ता. यावल जि.जळगाव) यांना १८ ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान एका अनोळखी नंबरवरून फोन येवून आशितोष कुमार असे बनावट नाव सांगून उज्जवला गॅस एजन्सीची डिलरशिप देते असे सांगून बनावट कागदपत्रे खरे भासविले. त्यांनी वेगवेगळे कारणे सांगून कालीदास सुर्यवंशी यांच्या खात्यातून एकुण १० लाख ३३ हजार रूपये लंपास गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी कालीदास सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा शोध लावून सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या पथकाने संशयित आरोपी सुनिल कुमार सहानी पिता ब्रम्हदेव उर्फ अनिल कुमार (वय ३८ रा. गुनाबस्ती पोस्ट तेजपूर जिल्हा समस्तीपुर बिहार), कन्हैय्या कुमार सहानी पिता राजेंदर सहानी (वय-४३ रा. बेलीया घाट मेन रोड कलकत्ता) यांना अटक केली आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे.