अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीमध्ये एका ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहीमापूर पोलीस ठाण्याअंतर्गत अत्याचाराची घटना घडली आहे. पीडित चिमुरडी ही आपल्या मैत्रिणी सोबत गावाबाहेर शौचालयाला जात होती. त्यावेळी गावातील एका २० वर्षीय नराधमाने तिला गवत कापायला जाऊ या बहानाने दुचाकीवर बसवून स्वतःच्या शेतात नेलं व तिथं तिच्याशी बळजबरी करून अत्याचार केला. पीडित मुलगी घरी आल्यानंतर तिने सर्व हकीकत आईला सांगितलं. त्यानंतर पीडितेला घेऊन आईने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून नराधम युवकाविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
















