जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अवघे ६० रूग्णांना कोरोनाची बाधित झाली आहे. तर ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ०६, जळगाव ग्रामीण- ००, भुसावळ-०३, अमळनेर-१२, चोपडा-०१, पाचोरा-००, भडगाव-०४, धरणगाव-०१, यावल-०३, एरंडोल-००, जामनेर-१२, रावेर-०६, पारोळा-०४, चाळीसगाव-०४, मुक्ताईनगर-०३, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील- ०० असे एकुण ६० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ५१ हजार ८८९ रूग्ण आढळून आले असून ४८ हजार ७६६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज ३ रुग्णांचा रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १२४१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आता १ हजार ८८२ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.