जळगाव (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र पुणे येथे स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे आकर्षक, सुरेख विषयांशी निगडीत असे बोधचिन्ह, विद्यापीठ बोधचिन्ह असणे आवश्यक आहे. यासाठी संचालनालयामार्फत ऑगस्ट २०२१ महिन्यात बोधचिन्ह स्पर्धा घेण्यात आली होती. या बोधचिन्ह स्पर्धेत ४०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. योग्य बोधचिन्ह न आढळल्याने समितीने ही स्पर्धा रद्द करुन पुन्हा नव्याने बोधचिन्ह तयार करण्याची र्स्प्धा आयोजित केली आहे. नव्याने आयोजित स्पर्धेमध्ये यापुर्वी झालेल्या स्पर्धेतील सहभागी स्पर्धेक देखील सहभागी होऊ शकणार आहे.
क्रीडा विद्यापीठ मिशन (Mission) संशोधन, प्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता गाठण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ तयार करणे, क्रीडा विद्यापीठ दृष्टीकोन (Vision) खेळ व तंदुरुस्तीच्या विकासासाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक यंत्रणा तयार करणे. क्रीडा विद्यापीठ ध्येय (Motto) क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्र व भारत हे क्रीडा शिक्षणास प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून परिचित व्हावे, क्रीडा विद्यापीठ उद्दीष्ट (Objectives) भारतामधील अव्वल खेळाडूंना अद्ययावत वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून पाठींबा देणे, क्रीडा कामगिरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन करणे, प्रशिक्षित क्रीडा व्यावसायिकांचा विकास करणे, क्रीडा क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे, क्रीडा प्रशिक्षक व संबंधितांना नियमित प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे, आधुनिक स्पर्धात्मक खेळांबरोबरच पारंपारिक देशी खेळांचा विकास करणे, समाजातील दुर्बल घटकांना क्रीडा नैपुण्यासाठी विशेष प्राधान्याने संधी उपलब्घ करुन देणे हा आहे. खेळाडू, क्रीडा तज्ञ, क्रीडा वैद्यक तज्ञ, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा प्रशासक इ. च्या सहकार्याने खेळांचा दर्जा उंचावणे, अल्प व मध्यम मुदतीचे अभ्यासक्रम सुरु करुन उतम दर्जाचे क्रीडा मार्गदर्शक तयार करणे, क्रीडा क्षेत्रात कुशल मनुष्ष्यबळ, विज्ञान व तंत्रज्ञान या मध्यामातून क्रीडा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे सुरु करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र हे भारतात प्रथमच होत असल्याने जगभरातुन प्रसिध्दी मिळणार आहे. या सर्व बाबी विचारात घेता आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र या विद्यापीठाचे आकर्षक बोधचिन्ह असणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र साठी बोधचिन्ह स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या सहभगाच्या दृष्टीने नियम व अटीसाठी शासनाच्या hhtp:// sports.maharashtra.govoin या संकेतस्थळावर भेट देऊन आपला सहभाग नोंदवावा
स्पर्धेचे नियम व अटी
निवड समितीच्या शिफारशीनुसार प्रथम क्रमांकाचे बोधचिन्ह सादर करणाऱ्या प्रवेशिकेस रु. 1 लाख रुपये मात्र इतके रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. सर्व बोधचिन्ह ईमेलव्दारे पाठविण्यात यावेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ बोधचिन्ह पाठवण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर, 2021 राहील त्यानंतर येणारे बोधचिन्ह विचारात घेतले जाणार नाही. सर्व स्पर्धकांचे बोधचिन्ह प्राप्त झाल्यानंतर त्यातून उत्कृष्ठ बोधचिन्हाची निवड समितीमार्फत निवड करण्यात येईल. बोधचिन्ह स्वीकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणे याबाबतचे सर्व अधिकार आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना राहतील.
बोधचिन्ह पाठवतांना कोरल ड्रॉ pdf.JPEG स्वरुपात पाठवावे, बोधचिन्हावर कोणत्याही प्रकारे नाव, क्रमांक, किंवा ओळख दिसून येईल अशा कोणत्याही बाबी नमूद केल्यास ती प्रवेशिका अपात्र ठरेल, बोधचिन्ह तयार करतांना ते मुळ स्वरुपात व स्वत: तयार केलेला असावा, स्पर्धेकाने बोधचिन्ह डिझाईन पाठवतांना त्याचे नाव, निवासाचा संपुर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आपला ई मेल पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये नमूद करावा, बोधचिन्ह पाठवितांना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या isumaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवावा, क्रीडा संचालनालयाच्या किंवा संकेतस्थळावर दिलेल्या मेल वर पाठवू नये, अन्य ईमेलवर पाठविण्यात आलेल्या प्रवेशिका ग्राह्य असणार नाहीत. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. उदय पवार 9730200656 तालुका क्रीडा अधिकारी, क्री.यु.से पुणे यांचेशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जाहिरात क्षेत्रात कार्यरत एजन्सीज, डिझाईनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या एजन्सीज तसेच ग्राफीक क्षेत्रात काम करणाऱ्या एजन्सीज देखील भाग घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा बोधचिन्ह क्रीएटीव्ह असावा, सेल्फ मेड असावा, त्यात रचनात्मकता असावी तसेच त्यातून उद्देश स्पष्ट होणे आवश्यक आहे. केवळ भारतीय व्यक्तीस र्स्प्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धेत परदेशात राहणारे मुळ भारतीय असणाऱ्या व्यक्तीस देखील सहभगी होता येईल. लोगो (बोधचिन्ह) A/४ साईझ कागदावर असावेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.