जळगाव (प्रतिनिधी) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जळगावच्यावतीने येत्या १२ व १३ डिसेंबर, २०२० रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी राज्यस्तरीय नामांकित उद्योजकांनी सहभाग नोदवून ऑनलाईन रिक्तपदे अधिसुचित केलेली आहे.
एस.एस.सी, एच.एस.सी, आय.टी.आय, पदवीधर, डिप्लोमा इ. विविध पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी एम्प्लॉयमेंट नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन ॲप्लाय करावे. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी वरील वेबसाईटवर नोंदणी करुन अप्लाय करावे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९६०५ वर संपर्क करावा. विभागाच्या संकेतस्थळावर जॉब व्हॅकेंसीजबाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येते, तरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघून अप्लाय करावे. रोजगार मेळावा हा ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांनी या कार्यालयात किंवा नियोक्त्याकडे प्रत्यक्ष उपस्थित राहुन गर्दी करु नये, असे आवाहन अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.















