धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या (दि. १ नोव्हेंबर २०२०) रविवार रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात विविध समाजपोयोगी कार्यक्रमांचे सकाळी (१० वाजता) आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव पालकमंत्री मा. ना गुलाबराव पाटील, कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजय सावंत, तसेच मान्यवर म्हणून एरंडोल पारोळा येथिल आ. चिमणराव पाटील, भडगाव पाचोरा आमदार किशोर पाटील, चोपडा आमदार लताताई सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबीरात रक्तदान शिबिर आणि व्हॉलीबॉल स्पर्धाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
तसेच आरोग्य तपासणी शिबिरासाठी खालीलप्रमाणे सुप्रसिद्ध डॉक्टर उपस्थित राहणार असून रुग्णांचा सेवेसाठी विविध तपासण्या मोफत करण्यात येणार आहे. त्यात डायबिटीस, , कोरोनामुळे उद्धभवलले आजारांची तपासणी सुप्रसिद्ध डॉ. सुयश पाटील, लहान मुलांमध्ये कमी वजनाचे बाळ व बालदमा रुग्णाची मोफत तपासणी जळगाव येथील अंकुर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉ. अजय शास्त्री (एम.डी) बालरोगतज्ज्ञ व नवजात शिशुतज्ञ, याचा मार्फत होईल. व डॉ. धिरज पाटील, (बालरोग तज्ज्ञ) थायरॉईड व रक्तातील साखर मोफत तपासणी श्री क्लिनिकल लॅब (नरेंद्र पाटील) भावे गल्ली धरणगाव, यांचा कडून करण्यात येणार आहे.
आरोग्य तपासणीचे ठिकाण
आराधना हौस्पिटल सोनवद रोड धरणगाव तसेच भव्य रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर व अभीष्टचिंतन सोहळा गजेंद्र नगर, महावीर नगरचा बाजुला येथे आयोजित केला आहे. भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा महात्मा गांधी उद्यान येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राज्यांचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री जळगाव ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दोघेही शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी केले आहे.