मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहे. एकीकडे खासदार संभाजीराजे राज्याचा दौरा करत असून कोल्हापूरमध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे. तर त्यांच्यापाठोपाठ आता शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनीही २६ जून रोजी औरंगाबादेत मेळावा घेण्याची घोषणा केला आहे. तसंच, आमचे आंदोलन हे मूक नसून बोलके असणार आहे, असा टोलाही त्यांनी संभाजीराजेंना लगावला.
मराठा समाजानं पुन्हा संघर्षासाठी तयार व्हावं असं आवाहन मेटे यांनी केलं. आमचं आंदोलन मूक नसेल तर बोलकं असेल असं म्हणत त्यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरही टीका केली. नक्षलवाद्यांच्या पत्रामागे दुसराच हेतू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. मुख्यमंत्र्याचा दिल्ली दौरा म्हणजे केवळ नाटक आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप विनायक मेटेंनी केला. मुख्यमंत्र्याचंनी या प्रकरणी वेळीच लक्ष न दिल्यास मराठा समाजातील वंचित नक्षलींच्या कारस्थानाला बळी पडतील असं मेटे म्हणाले.
दुसऱ्याकडे मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढून समाजाला वेठीस धरणार नाही अशी भूमीका खासदार संभाजी राजे भोसले यांनी घेतली. मोर्च्याऐवजी ३६ जिल्ह्यांमध्ये मूक आंदोलन केलं जाईल आणि १६ तारखेला कोल्हापुरातून त्याची सुरुवात होईल अशी घोषणा त्यांनी औरंगाबादमध्ये केली.