जळगाव प्रतिनिधी । आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात जिल्ह्यात ७०३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १८ रुग्णांचा जीव गेला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४२ हजार ५५९ वर पोहचली आहे.
आज मिळलेल्या अहवालानुसार , जळगाव शहर १०३, जळगाव ग्रामीण २५, भूसावल ४९, अमळनेर ७०, चोपडा ९९, पाचोरा ३०, भडगाव २०,धरणगाव २७, यावल १४, एरंडोल ६५, जामनेर ९३, रावेर १५, पारोळा ०८, चाळीसगाव २७, मुक्ताईनगर २२, बोदवड ३२ व इतर जिल्ह्यातील ०४. आज दिवसभरात ८०२ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्याही ३१ हजार ५०३ झाली. गेल्या २४ तासांत १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या १०६१ झाली आहे.