लातूर (वृत्तसंस्था) चॉकलेटचे आमिष दाखवून अंगणात खेळणाऱ्या एका ५ वर्षाच्या चिमुरडीस निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करताना एका ६० वर्षाच्या नराधमास ताब्यात पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. ही घटना औसा तालुक्यातील एका गावात घडली असून या प्रकरणी किल्लारी पोलिसांत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधीक माहिती अशी की, औसा तालुक्यातील एका गावात मजुरी करुन उदरनिर्वाह करणारे कुटूंब वास्तव्यास आहे. त्यांच्याच शेजारी नराधम विठ्ठल भिवाजी शिंदे (वय ६०) हा सुध्दा वास्तव्यास आहे. पिडीत मुलीच्या घरासमोर पाण्याची टाकी असल्यामुळे मुले- मुली येथे सतत खेळत असतात याची संधी सधून नराधम विठ्ठल शिंदे हा एका ५ वर्षाच्या मुलीस चॉकलेट घेऊन देतो असे सांगून एका दुकानावर घेऊन गेला, तिथे चॉकलेट घेऊन दिले आणि तिला एका निर्जनस्थळी घेऊन गेला.
पिडीत मुलीच्या वडिलांच्या लक्षात हि बाब येताच त्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करित असताना शिंदे सापडला. त्याला पकडून गावातील नागरीक पोलीस ठाण्यात दाखल झाले. या संदर्भात किल्लारी पोलिसांत गुरनं १४४/२३ कलम ३५४, ३७६ (२) (फ), ५११, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्से) कलम ४, ६, ८, १२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.















