जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका १६ वर्षीय मुलीला अनैतिक कृत्य करण्यास पाडल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून शनिवारी (दि. २५) एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा झाला आहे.
शहरातील एका भागात ही सोळावर्षीय अल्पवयीन मुलगी परिवारासह वास्तव्याला आहे. ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता नितू ऊर्फ जोया राजू बागडे (३१, रा. जळगाव), ज्योती चंद्रकांत सरदार (२८) आणि चंद्रकांत शंकर सरदार (२९, दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव) यांनी पीडितेला चाळीसगाव येथे बोलावून तिला नशेचे द्रव्य पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला घरी पाठविले. पुन्हा १० फेब्रुवारी रोजी चाळीसगावला घेऊन गेले. तिथे २३ फेब्रुवारीपर्यंत रोज रात्री अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. शनिवारी पीडित मुलीने आईसह एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिघांविरोधात तक्रार दिली.