धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिच्याच जेठाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ११ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास विवाहिता घराच्या मागील रूममध्ये झोपलेली अहोती. याठिकाणी तिचा जेथ आला आणि त्याने विवाहीतेसोबत संतापजनक कृत्य केले. या कृत्याला विवाहितेने विरोध केला असता त्यावर त्याने विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मी तुझ्या सोबत बळजबरी करेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी विवाहितेने धरणगाव पोलिसात धाव घेत जेठ विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ.खुशाल पाटील हे करीत आहेत.
















