सावदा (प्रतिनिधी) येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका संचालकासह मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मुलीला ३ ऑगस्ट रोजी अक्रम खान अनामुल्ला खान याने पिडीतेला कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने शाळेच्या कार्यालयात बोलावले आणि तिला वाईट हेतूने स्पर्श केला. हा प्रकार पीडितेने शिक्षकासह मुख्याध्यापकाला आपबीती सांगूनही त्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तसेच त्यांनी मुलीवर दबाव आणत झालेली घटना कोणालाही सांगू नकोस’ असे सांगितले. यामुळे मुलगी भयभीत झाली. विनयभंग केल्यानंतर कोणालाही ही गोष्ट सांगितल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती.
त्यामुळे मुलगी शाळेत जाण्यास टाळाटाळ करीत असल्याने तिच्या आईने विचारल्यावर मुलीने झालेला प्रकार सांगितला. दि.७ ऑगस्ट रोजी सावदा पोलिस ठाण्यात पिढीतेच्या फिर्यादीवरून शाळा संचालक अक्रम खान अमानुल्ला खान, मुख्याध्यापक इरफान खान जमशेर खान, क्लास टीचर शेख अर्शद शेख सईद, शेख फिरोज शेख सुपडू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विनोद खांडबहाले करत आहेत.