वरणगाव (प्रतिनिधी) सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग केल्याची धक्कादायक घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिसात दिलेल्या फिर्यादीत पिडीत महिलेने म्हटले आहे की, दि.१३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चहा बनविण्यावरून झालेल्या वादानंतर पत्नी व मुलाला का मारले? याचा जाब विचारून सावत्र आईला चापट्याबुक्यांनी मारहान करून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्ये केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोहेका मुकेश जाधव हे करीत आहेत.