यावल (प्रतिनिधी) मतीमंदत्वाचा व एकटेपणाचा फायदा घेत १४ वर्षीय मुलीवर बलात्कार एका बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एका नराधमाला अटक करण्यात आलीय.
या संदर्भात पिडीत मुलीच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यातील एका गावी १३ जुलै २०२२ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गल्लीतीलाच शांताराम मधनसिंग गायकवाड (वय ५२) याने पिडीत मुलीच्या मतीमंदत्वाचा व एकटेपणाचा फायदा घेऊन तोंड दाबून बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोउपनिरी सुनिता कोळपकर ह्या करीत आहेत.