चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील ५६ वर्षीय वृद्धाने अवघ्या दोन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लोटन पाटील (वय ५६), असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.
दि.९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लोटन पाटील याने पिडीत अवघ्या २ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी गुरनं ००५/२०२४ , भा द वि कलम ३७६ सह कलम बाल लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ४, ८, १२, सह अ.जा.ज.अ. प्र.का १९८९ सुधारित अधिनियम सन २०१५ चा कायदा कलम ३(१)(r)(s)( w), ३(२) (v-a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहेत.