धरणगाव (प्रतिनिधी) भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची अखिल भारतीय प्रवासी सेवा सुविधा समिती (रेल्वे बोर्ड पीएसी कमिटी) चे पाच सदस्यांनी नंदुरबार ते धरणगाव स्थानकापर्यंत निरीक्षण दौरा केला. या दरम्यान ह्या समितीने धरणगाव स्थानकाला भेट दिली. सदर समिती २ सप्टेंबरपासून ताप्ती सेक्शनअंतर्गत सुरत उधना, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर व धरणगाव आदी स्थानकांचे निरीक्षण केले.
समितीत सदस्य म्हणून डॉ. राजेंद्र फडके, जळगाव, छोटूभाई पटेल, सुरत, कैलास वर्मा, मुंबई, अॅड. विभा अवस्थी, रायपूर, छत्तीसगड आणि गिरीश राजगोर आदींचा समावेश होता. याप्रसंगी तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी, उपाध्यक्ष रविंद्र भागवत, सचिव एस. डब्लू. पाटील यांनी समस्यांचे निवेदन दिले. १) ताप्ती गंगा एक्सप्रेसला धरणगाव थांबा मिळावा. २) प्लॅटफॉर्म एकवर रेल्वे तिकीट खिडकी पासून लांब उभी राहते. ती जवळ उभी व्हावी. ३) प्लॅटफॉर्म नंबर दोन वर तिकीट खिडकी सुरु करावी. ४) भुसावळचा पुढे बुऱ्हाणपूर व खंडवाकडे जाणाऱ्या रेल्वेना धरणगाव येथे थांबा मिळावा. ५) धरणगाव रेल्वे स्टेशनवर सुशोभीकरण करून बगीचा विकसित व्हावा. ६) उद्घोषणा करणाऱ्या व्यक्तीचे नेमणूक व्हावी. ७) वातानुकूलन प्रतीक्षालय सुरू करण्यात यावे. ८) आधी सुरू असलेली संध्याकाळची भुसावळ- सुरत पॅसेंजर नि ३/४ ट आधी माग आले.
याप्रसंगी प्रवासी मंडळाचे साहसचिव किरण वाणी, कोषाध्यक्ष हितेश पटेल, सदस्य डॉ. मिलिंद डहाळे, किरणसिंग परिहार, सुरेश कासार, दिनकर पाटील, दिनेश मेहेर, सुदाम चौधरी, ललित येवले, आनंद वाजपेयी, बाळकृष्ण पाटील, सुनील चौधरी, सुशील कोठारी व सर्व पत्रकार उपस्थित होते.
















