पाचोरा (प्रतिनिधी) मागील एक वर्षापासून एका ४८ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर विविध अश्लिल मेसेस पाठविण्याऱ्या रवींद्र कल्लू पवार (रा.जुना रोड सावदा रोड, श्रीराम कॉलनी, रावेर) याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, रवींद्र कल्लू पवार या त्याच्या मोबाईलवरून पिडीत महिलेच्या मोबाईल क्रमाकावर १ नोव्हेंबर २०२१ पासून ते २० मे २०२२ पर्यंत वेळोवेळी आय लव यु राणी, सारखे वेगवेगळे भरपूर अश्लिल मेसेस पाठवत होता. तसेच पिडीत महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून त्याच्या विरुध्द दाखल केलेली केस मागे घे, असे बोलून पिडीतेच्या आईस धक्काबुक्की केली. तसेच पिडीतेचा हात घरुन, तू मन आवडी छी, मन तारेसा विया करेर छ, मारे साथेम चाल, असे बोलून पिडीत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. एवढेच नव्हे तर जर माझ्याशी लग्न नाही केले. तर तुला जिवे ठार मारेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी रवींद्र पवार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि राहुल मोरे हे करीत आहेत.