पाचोरा (प्रतिनिधी) अनेक गुन्हे नाववर असलेल्या संजय त्रिभुवन (रा.वाक, ता.भडगाव) याला उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
संजय त्रिभुवनवर वाळू चोरीच्या गुन्ह्यात वारंवार सहभाग, वाळूचोरी रोखणाऱ्या पथकावर हल्ला, मारहाण, शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी देणे, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्रिभुवन याने २०२० मध्ये गस्तीवरील तलाठी एन.के.पारधी, व्ही.पी.शिंदे यांच्यावर जिवघेणा हल्ला केला होता. त्यामुळे पाचोरा व भडगाव येथील पोलिस निरीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. नंतर डॉ. बांदल यांनी चौकशी अंती त्रिभुवन याला वर्षासाठी हद्दपार केले. दरम्यान, या कारवाईमुळे वाळू तस्करांना चांगलाच धक्का बसला आहे.