पाचोरा (प्रतिनिधी) रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवकाला धनादेशावरती सही देण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच घेणाऱ्या वरसाडे प्र.पा. ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे (वय ५२), वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायतीचे महिला सरपंच यांचे पती शिवदास भुरा राठोड (वय ६७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार हे ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम केले. त्यांचे मिळणारे मानधनाच्या धनादेशावरती सही देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे वरसाडे प्र.पा. ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे (वय ५२) यांनी स्वतःसाठी व वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायतीचे महिला सरपंच यांचे पती शिवदास भुरा राठोड (वय ६७) यांचेसाठी प्रथम पंचासमक्ष 6,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000 रुपये लाचेची मागणी केली. व सदर लाचेची रक्कम शिवदास राठोड यांचेकडेस देण्यास सांगितल्याने सदर लाचेची रक्कम शिवदास राठोड यांनी स्वतः पंचासमक्ष व काशिनाथ सोनवणे यांच्या समक्ष ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. कार्यालयात स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव ॲन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी केली.