धरणगाव (प्रतिनिधी) सोनवद रस्त्यावरील स्मशानभूमीतील बंद खोलीत दारूच्या बाटल्या, झोपण्यासाठी गादी आणि कंडोमची पाकिटं आढळून आल्यानंतर या ठिकाणी वासनाकांड घडलंय का?, असा प्रश्न धरणगावकरांना सतावतोय. त्यामुळे पालिका प्रशासनासह पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍड. संजय महाजन यांनी केली आहे.
सोनवद रोडवरील स्मशाभभूमीत एक खोली नेहमी कुलूप लावून बंद असते. स्मशानभूमीतील बंद खोलीत काय असू शकते? असा विचार करून सर्वांचेच तिकडे दुर्लक्ष होत होते. परंतू आज सकाळी अज्ञात व्यक्तीने खोलीचे कूलूप तोडले आणि जे आढळून आले, ते बघून सर्वांनाच धक्का बसला.
या खोलीत दारूच्या बाटल्या, गादी, ताट, तांब्या, कंडोमचे पाकिट, तेलाचे डबे, ग्लास, एका पिशवीत कांदे, इतर पदार्थ आणि काही दुचाकी गांड्या नंबर प्लेट आढळून आल्या. याबाबतची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. बंद खोलीत अशा प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य आढळून आल्यामुळे या ठिकाणी वासनाकांड तर घडले नाही? अशी जोरदार चर्चा गावात सुरू झाली.
यामुळेच भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍड. संजय महाजन यांनी या प्रकरणाची पालिका प्रशासनाने तसेच पोलीस प्रशासनाने दखल घेत सखोल चौकशी करावी. कारण या आधी देखील ‘धरणगाव आंटी प्रकरण’ मधील दोषी कोण होते?, हे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतरही समोर आले नव्हते. त्यामुळे किमान या वेळी तरी स्मशानभूमीतील खोलीत अश्लील चाळे करणारे कोण? हे, धरणगावकरांच्या समोर आले पाहिजे,असेही संजय महाजन यांनी म्हटले आहे.