धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर ५६ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील १६ जणांना आज न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास एका धार्मिक स्थळाजवळून काही जण जात असताना अचानक दगडफेक झाली. त्यात पोलिसासह तीन जण जखमी झाले. हल्लेखोरांनी तीन वाहनांचे तसेच काही दुकानांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ५६ संशयित आरोपींना अटक केली होती. त्यातील १६ जणांना आज न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांना एरंडोल आणि धरणगाव पोलीसात ठेवण्यात आले आहे.
यांची झालीय पोलीस कोठडीत रवानगी !
राहुल तुकाराम उर्फ संजय पाटील (वय-२८), विकी राजेंद्र बिढे (वय २२), मिहीर ऊर्फ मोहित प्रल्हाद बिढे (वय २२), दिपक राजेंद्र चौधरी (वय- २७), धिरज अरुण सुतार (वय- २१, दोन्ही रा. जोशी पेठ, जळगाव), पंकज राजेंद्र पाटील (वय २५ वर्षे, रा. तेली चौक जुने जळगाव), शेख नदिन शेख गफ्फार (वय- २७), अजरोद्दीन शेख अमिनोद्दीन (वय २६), आदिल जब्बार शेख (वय २२), मोहीन शेख मुस्ताक (वय २२), शेखी रफिक शेख तौसीफ (वय २७), शेख रिजवान शेख रशिद (वय २६), आवेद खान असलम खान (वय १९), महोम्मद वसिम मोहम्मद कलीम (वय- २५),इद्रिस शेख शब्बीर (वय- २४), ऐजाज अहमद शब्बीर, (वय – ३६) यांची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान, संशयित आरोपींकडून अॅड. राहुल पारेख, अॅड. आर.एस. पाटील, अॅड. महेंद्र चौधरी, अॅड. असिफ कादरी, अॅड. इज्राहिल युसुफ, अॅड. शहा तर सरकारी वकील म्हणून अॅड. जिज्ञाली बडगुजर मॅडम यांनी कामकाज बघितले.