पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत धरणगाव येथील उ.बा.ठा. युवासेना शहर प्रमुख पप्पूभाऊ कंखरे, भावेश पाटील, वाल्मिक धनगर, अनिल पाटील, चेतन केदार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या वेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वांना भगवा रुमाल परिधान करून शिवसेनेत स्वागत केले. शिवसेनेच्या ध्येय -धोरणा नुसार कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करावे असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले. या प्रसंगी उपतालुका प्रमुख मोतीआप्पा पाटील, सुनील पाटील, नवलराजे पाटील, युवासेनेचे आबा माळी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.