पाळधी (शहाबाज देशपांडे) तालुक्यात पाळधी खुर्द या ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन पॅनेल व विकास पॅनल यांच्यामध्ये काट्याची लढत होती. दिलीप पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचे १४ जागांवर तर विकास पॅनेलच्या ३ जागांवर उमेदवार विजयी झाल्याने परिवर्तन पॅनलचे निर्विवाद बहुमत आले आहे.
तालुक्यात दोन्ही पॅनल हे शिवसेना पुरस्कृत असल्याने पाळधी खुर्द वर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जरी बिनविरोध करता आली नसली तरी सुद्धा पाळधी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीवर शिवसेनेची पकड दिसून येते. या निवडणुकीत भारती दिलीप पाटील , शाइस्ता आरीफ देशपांडे, सुनंदा भगवान पाटील, ननवरे सुरेश दाजीबा, सूरीया शकील बागवान, कोळी लक्ष्मी शरद, दिगंबर हिरामण पाटील, शोभा प्रभाकर माळी, शमीना शरीफ देशपांडे, जब्बार भैय्यासाहेब शेख, मानकरी पंचशिला अरविंद, पाटील विनोद अशोक, कुमार संजय दौलत, उषाबाई संतोष माळी यांनी विजय मिळविला आहे.