पारोळा (प्रतिनिधी) येथील एका कार्यालयात काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ८ रोजी एका सराईत गुन्हेगाराविरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
येथील एका कार्यालयातील २९ वर्षीय महिला कर्मचारी या कार्यालयीन कामानिमित्त दुचाकीने जात होत्या. पारोळा ते विचखेडे दरम्यान या महिलेच्या दुचाकीसमोर येथील राजीव गांधी नगरमधील समाधान लोटन चौधरी (वय ३५) याने त्याची दुचाकी आडवी लावून विनयभंग करत धमकी दिली. याबाबत पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून समाधान चौधरी विरोधात विविध कलमान्वये पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, समाधान चौधरीने वेळोवेळी धमकी देऊन तीन वर्षांपासून पिडीत महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली दिली असल्याचे कळते. विशेष म्हणजे चौधरी हा सराईत गुन्हेगार असून त्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर येत आहे.