नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इंधनदरवाढीत होपळून निघालेल्या सर्वसामान्यांना केंद्राबरोबरच राज्य सरकारनेही दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. दरम्यान बाजार विश्लेषकांनुसार, ग्लोबल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोलियम कंपन्या पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवू शकतात.
ग्लोबल मार्केटमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव आज 113 डॉलर प्रति बॅरलजवळ पोहोचला आहे. जाणकारांनी आधीच जर कच्च्या तेलाचा दर 110 डॉलरच्या वर गेल्यास कंपन्यांना पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढवावा लागू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. केंद्राकडून एक्साइज ड्यूटी आणि राज्यांनी वॅटमध्ये कपात केल्यानंतर इंधन दर कमी झाला. परंतु आता पुन्हा पेट्रोलियम कंपन्यांना दर वाढवण्याची संधी मिळू शकते.
सध्या मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये लीटर आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवर वॅट 2.08 रुपये लीटर आणि डिझेलवर 1.44 रुपये लीटर कपात केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केलं आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेल दर कमी झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 7.16 रुपये आणि डिझेलचा भाव 7.49 रुपयांनी कमी झाला आहे.