मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने तेलावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटही कमी केला. भारतीय तेल कंपन्यांनी आजचे नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. कंपन्यांनी इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.
कच्च्या तेलाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये प्रतिलिटर विकलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7.50 रुपयांनी स्वस्त झाले होते. दरम्यान, कच्च्या तेलाने पुन्हा कंपन्यांवर किमती वाढवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई – पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर
दिल्ली – पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर