जयपूर (प्रतिनिधी) राजस्थानातील श्रीगंगानगरमध्ये आज (बुधवार) पेट्रोलचे दर १०० रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. ऑइल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५-२५ पैशांची वाढ केली आहे. सलग नवव्या दिवशी तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेटानुसार, नॉन प्रीमिअम पेट्रोलची रिटेल किंमत प्रतिलीटर १०० रुपये १३ पैसे इतकी झाली आहे. देशभरातील पेट्रोल दरांमधील हा उच्चाकं आहे. दुसरीकडे गंगानगरमध्ये डिझेलचा दर ९२ रुपये १३ पैसे इतका झाला आहे.दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत २५ पैशांनी वाढले आहेत. यामुळे सध्या पेट्रोलसाठी प्रतिलीटर ८९ रुपये ५४ पैसे आणि डिझेलसाठी ७९ रुपये ९५ पैसे मोजावे लागत आहेत. फक्त १० दिवसांमध्ये इंधनाचे दर तीन रुपयांनी वाढले आहेत.