जळगाव (प्रतिनिधी) वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी फिनिक्स युथ फाउंडेशनने वंचितांसोबत दिवाळी साजरी केली.
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात तसेच शहरात रस्त्याच्या कडेला घर करून राहणाऱ्यांच्या घरात दिवाळीचा सण साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. अशा वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी फिनिक्स युथ फाउंडेशनच्या वतीने झोपडी वस्ती करून राहणाऱ्या 75 गरजू कुटुंबांना दिवाळीचे फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी फाउंडेशनचे सदस्य विशाल वाणी, हर्षल इंगळे, पियूष वानखेडे, चिरायू जोशी, संकेत कापसे, राकेश कोळी, तेजस भावसार, अनुज अग्रवाल, पियूष गांधी, दिपक व्यास, चेतन सोनवणे, सचिन महाजन, देवेंद्र चंदन, दिनेश वाघ, वैभव पिंगाळकर उपस्थित होते.