धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील सिंधू गार्डनजवळ तीव्र वळणावर कुलर व फरशीने भरलेली महिंद्रा कंपनीची चारचाकी पिकअप क्र. (एमएच क्र.04 GF 9220) पलटी झाली. या अपघातात चालकासह इतर दोन जणांना किरकोळ दुखापत झाली. चालक पप्पू माने (वय -३१ ,रा. शिवाजी नगर जळगाव), पवन मराठे, सुरेश बागुल (दोन्ही रा. धरणगाव) असे या जखमींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, धुळे येथून धरणगावच्या दिशेने फरशी व कुलर भरून वाहन निघाले होते. रात्री साधारण साडेदहा वाजेच्या सुमारास धरणगावच्या पाटाजवळ गाडीचा एक्सल तुटल्याने पिकअपने पलटी घेत थेट सिंधू गार्डनच्या मुख्य दरवाजा जवळ थांबले. या अपघाताचा मोठा आवाज ऐकून लगतचे स्थानिक रहिवासी शिवसैनिक छोटू जाधव, शिवसेना उपशहर प्रमुख रविंद्र जाधव, भरत महाजन, कमलेश बोरसे, सिंधु गार्डनचे संचालक साहेबराव महाजन, राहुल रोकडे, आबा पाटील, ज्ञानेश्वर पांडुरंग माळी, मधुकर माळी, गजानन महाजन, मुन्ना पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते समाधान मोरे, भैय्या पाटील, निलेश पवार, विनोद रोकडे, राजेंद्र वाघ आदींनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थितांनी पिकअपमध्ये अडकलेले चालक पप्पू माने, पवन मराठे व सुरेश बागुल इतर दोन जणांना बाहेर काढले. या अपघातात पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले. तर पिकअप वाहनाच्या एक्सल रॉड तूटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.