पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात अवैध पद्धतीनं सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (High profile sex racket exposed) करण्यात आला आहे. पोलिसांनी एका लॉजवर छापेमारी करत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक (2 Accused arrested) केली आहे. तसेच वेश्या व्यावसायात गुंतलेल्या एका अभिनेत्रीसह दोन अन्य तरुणींची सुटका केली आहे.
छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे येथील साई लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावला. त्यानंतर लॉजवर छापा मारुन कारवाई करण्यात आली.
आरोपी मोबाईलवरुन व्हॉट्सअॅप कॉल करुन वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवण्याचे काम करत होते. संबंधित मुली त्यांच्या नावावर हॉटेलमध्ये रूम बुक करत असत. या दलदलीतून छत्तीसगडच्या अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची सुटका करण्यात आली. दोन दलालांना पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कोणाकोणाला अटक?
जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी, हेमंत प्रणाबंधू साहू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.