मुंबई (वृत्तसंस्था) खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेलने प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्याने ग्राहक वैतागले आहेत. ग्राहकांना आता प्रीपेड प्लान्सवर ५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. जर तुम्हीही इंटरनेटसोबत अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लान घेण्याचा विचार करत असाल तर Jio आणि Airtel च्या १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Jio Recharge Plan: जियो कंपनीने त्यांच्या ७३ रूपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग 2.5GB डेटा आणि 50SMS या सुविधा दिल्या आहेत. या प्लानची वैधता २३ दिवस आहे. तसेच जिओ कंपनीच्या ९१ रूपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100MB डेटा आणि 50SMS या सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच या प्लानमध्ये 200MB एक्स्ट्रा डेटा देण्यात आला आहे. याची वैधता २८ दिवस आहे. हे दोन्ही प्लान बजेट फ्रेंडली आहेत.
Jio चा दररोज 1.5GB चा सर्वात स्वस्त प्लान ११५ रुपयांचा आहे. याची वैधता १४ दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 300SMS ची सुविधा देण्यात येते.
Airtel Recharge Plan: एअरटेलचा अनलिमिटेड कॉलिंग सुविधा असणारा सर्वात स्वस्त प्लान १९ रूपयांचा आहे. या १९ रूपयांच्या प्लानमध्ये 200MB डेटा मिळतो.
Airtel चा दररोज 1.5GB चा सर्वात स्वस्त प्लान २९९ रुपयांचा आहे. याची वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा देण्यात येते. याव्यतिरिक्त अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं मोबाईल अॅडिशनचा ३० दिवसांचं सब्स्क्रिप्शन दिलं जातं.